Sunday, 31 July 2016

ट्रेक सरसगड चा! १६ जुलै २०१६

अचानक पणे आज ठरल कि पालीगावात असलेल्या सरसगड किल्ल्याला भेट द्यायची. उद्या शनिवार होता. सगळ्या ग्रुप वर तसा मेसेज शेअर केला. सरसगड, मुंबई पासून साधारण ११० किलोमीटर अंतरावर असलेल्या पाली गावाजवळ आहे. यालाच पगडीचा किल्ला असेही म्हणतात. माझा खूप जुना मित्र अपूर्व याला सुद्धा मेसेज केला होताच. कधी नवे तर त्याचा रिप्लाय आला आणि मला सरसगड ट्रेक साठी कंपनी मिळाली.
ठरल्याप्रमाणे सकाळी ७.३० वाजे पर्यंत पनवेल रेल्वे स्टेशन वर भेटायचं होत. मी अंधेरी होऊन वडाळा आणि वडाळाहून पनवेल कडे जाणारी पहाटे ६.१८ ची लोकल पकडली. आज पाऊस उघडला होता म्हणून थोडं आमचं निभावल होतं. अपूर्व सुद्धा वेळेतच तिथे पोहोचला.

बऱ्याच म्हणजे तस ३-४ वर्षांनी आमची भेट झाली होती आज. बोलत बोलत आम्ही पनवेल एस. टी डेपोकडे चालू लागलो. पुढे आम्हाला पाली कडे जायचं होत आणि वेळेत पोहोचणं गरजेचं होतं. वाटेत इडली आणि पोह्याचा नाश्ता करून घेतला. डेपो मध्ये पोहोचताच आम्हाला ७:५० ची श्रीवर्धन गाडी मिळाली. थेट पाली कडे जाणाऱ्या बस साठी वाट पाहत बसण्यापेक्षा याने नागोठणे पर्यंत जाऊ आणि तिथून पुढे डमडमने प्रवास करू अस ठरवलं. साधारण ९:४५ वाजता आम्ही वाकण फाटाला उतरलो. तिथे डमडम लागली होती. पटकन आम्ही आमच्या बॅग्ज घेऊन आत बसलो. पुढच्या १५ मिनिटात आम्ही पाली गावामध्ये पोहोचलो. समोरच सरसगड आकाशात भरारी घेत होता. पाऊस उघडला असल्याने एकूणएक बरं वाटत होतं. एका हॉटेलात कपभर चहा घेऊन किल्ल्याची थोडीशी माहिती घेतली. आणि आमचा ट्रेक सुरु झाला.

नागोठण्यापासून १० किलोमीटर व खोपोली पासून ३५ किलोमीटर वर असलेल्या या पाली गावात प्रख्यात श्री बल्लाळेश्वराच मंदिर आहे. मंदिराकडून थोडस मागच्या बाजूला आल्यावर डाव्या बाजूला गडावर जाणारी वाट दिसते. गडाची एकूण उंची कमी असल्यामुळे वर पोहोचण्यास एक किंवा सव्वा तास पुरेसा होतो, परंतु वाट चढाईची असल्याने चांगलाच घामटा निघतो. अपूर्व आणि मी चालायला सुरवात केली. दुपारी १ वाजेपर्यंत खाली येऊन परतीचा प्रवास सुरु करायचा असं ठरवलं. सकाळचे १०.४५ झाले होते. आणि आम्ही एका पठारावर पोहोचलो. 


समोरच सरासगडाच्या भिंती दिसत होत्या. इथून पुढे समोरच्या वनराई मधून वर चढलं कि थेट तुम्ही त्या भिंतीजवळ येऊन पोहोचता. इथे पोहोचल्यावर गडाच्या त्या प्रचंड आकाराची प्रचीती येते.

गडाच्या द्रीष्टीक्षेपात आल्यावर कातळात एक भुयारी मार्ग दिसतो. तिथेच आत बऱ्यापैकी मोठी गुहा आहे. जस वर येऊ तस दोन अगदी उंच अखंड दगडाच्या खांबात कातळात कोरलेल्या अगदी दीड दोन फूट उंचीच्या पायऱ्या दिसू लागतात. या पायऱ्या चढून वर येताना एक वेगळाच अविश्वसनीय अनुभव मिळतो. - मिनिटातच पायऱ्या चढून आपण गडाच्या दिंडी दरवाज्याकडे येतो. 


आत आल्यावर समोरच एक गुहा आहे. बहुतेक गडावरचा पुजारी तिथे राहात असावाइथून पुढे आल्यावर गडाच्या तटबंदी कडे जात येतं. पण जरा सांभाळून. या तटबंदी भिंतींवर जंगली मधमाश्यांचे पोळे आहेत. आम्ही तटबंदीकडे पोहोचलो आणि एका मिनिटांच्या आत तिथे शेकडो मधमाश्या घोंगावू लागल्या. बहुतेक आमच्या हालचालीमुळे त्यांना संकट आल्यासारखं वाटलं असेल बहुतेक. मी इतक्या जोरात अपूर्व ला हाक दिली के बस्स! आणि म्हंटलं "रन". आम्ही लगेचच पुन्हा दरवाज्याकडे आलो. मधमाश्या जाईपर्यंत आमच्या बॅग्स तिथेच पडून होत्या. तात्पर्य हे कि मधमाश्यांचा हल्ला झाला तर पळून सुरक्षित जागी जा किंवा आहेत तिथे खाली पडून राहा हालचाल करता
 
वर आल्यावर समोरच एक वाट बालेकिल्ल्याकडे चढते. बालेकिल्ल्याच्या सुळक्याच्या पायथ्याला १० तरी पाण्याचे हौद आहेत.
   
सुळक्याच्या मागे वळसा घालून वाट बालेकिल्ल्यावर चढते. तिथेच गडाचा खोपोली कडे उतरणारा दुसरा दरवाजा ही दिसतो. तिथून उतरून सुद्धा पाली गावात जाता येत. ही वाट जरा पायऱ्याच्या वाटेपेक्षा थोडी सोपी दिसते.
बालेकिल्ल्यावर चढताना - फूट उंचीची कातळभिंत लागते. चढण्यास सोपी आहे पण काळजी घेणे अति आवश्यक. वर गेल्यावर आपल्याला एक तलाव दिसतो. आणि बाजूलाच एक शिवमंदिर आहे दगडात कोरलेल्या योगेश्वरी देवी देवता सुद्धा आपल्यला पाहायला मिळतात.


आमचा ट्रेक खूपच छान झाला. परत येताना आम्ही खोपोली मार्गे आलो. संध्याकाळी ७ वाजता आम्ही सारे घरी होतो.

गडावर राहण्यासाठी गुहा आहेत पाणी सुद्धा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. जेवणाची सोय स्वतः करावी. मधमाश्यापासून सावधान असा एक बोर्ड
वर लावला पाहिजे.Ayudh Adventures paytm Code for funds Transfer

Dear Trekkers, Avoid last moment hassles to register yourself on any trek.                                     We...