Friday, 21 July 2017

नाणेघाट दुर्गभांडार आणि ऐतिहासिक महत्व


नानाचा अंगठा
नानेघाट हा सातवाहन काळातला २००० वर्षांपूर्वीचा एक व्यापारी राजमार्ग आहे. इथनं समुद्रमार्गाने येणारे जे विदेशी व्यापारी असतील किंवा कोकणातले लोक असतील ते त्यांचा माल घेऊन या मार्गे त्या काळी घाटावर येत असत.
कल्याण जुन्नर मार्ग

नाणेघाटाकडे जाणारी पायवाट - घाटवाटांचे सोबती सुरेश देवकर यांच्यासोबत
त्या काळी सातवाहन काळामध्ये (सातवाहन काळ म्हणजे इ. स. १५० व  इ. स. पू. १५० ). सातवाहन लोक जे होते, सातवाहन सत्ता होती, तय सत्तेमध्ये पहिला राजा सातकर्णी याने आपल्या कारकीर्दीमध्ये हा नानेघाट बनवला होता आणि इथ ज़कातीच्या स्वरुपामध्ये नाणी गोळा केली जायची। म्हणून त्याला नानेघाट अस नाव पडलं.
जकात (नाणी) जमा करण्यासाठी असलेला दगडी रांजण - सोबत मधुकर धुरी


जकात (नाणी) जमा करण्यासाठी असलेला दगडी रांजण सुरेश देवकर व  साबळे मामा सोबत
म्हणजे मग तो टोल आत्ता सुद्धा आहे का?
खर तर टोल आत्ता बंद आहे. परन्तु नानेघाट आजपण वापरला जातो फक्त नाणी नाही टाकत. सुरुवातीला घाटाच्या सुरुवातीला एक रांजण असायचा आणि एक पहारेदार असायच. जे व्यापारी खालनं माल घेऊन देशावरती येत असत त्यांच्याकडनं ते जकात जमा करायचे.
नाणेघाट उतरताना - नेहमीचे सोबती साबळे मामा - राहणार सावर्णे

पण मग हा कोणी बांधला असा टोल रोड?
हा बांधला गेला कारण परदेशी जे व्यापारी होते ते व्यपारासाठी माल घेऊन आपल्या ठिकाणी भारतामध्ये यायचे. तसेच आपल्या कोकणातले कही व्यापारी असतील ते देशावरती यायचे. तर त्यांना येण्यासाठी आपण बघतो की खुप मार्ग आहेत मालशेज वगैरे, तसे मार्ग त्या वेळेस नव्हते। ही गोष्ट साधारण २००० वर्षपूर्वीची आहे. तर त्या वेळेस तय सातकर्णी राजाने व्यापाराचा मार्ग बनला जावा म्हणून हा नानेघाट बनवला होता.
जुन्नरमार्गे नाणेघाटावर येणारा डांबरी मार्ग 


नाणेघाट निसर्गरम्य परिसर
ह्याबद्दल अजुन सांगयच झाल तर नाणेघाटाच्या जवळ जुन्नर शहर आहे. जुन्नर शहर हे सातवाहन बाजारची उपराजधानी होती आणि आपलं पैठण जे आहे, पैठण त्यांची बाजराची मुख्य राजधानी होती.

नाणेघाटाची गुहा
 नाणेघाटाचं वैशिष्ट्य म्हणजे लेण्या. जगभर एकूण १२०० ते १२५० लेण्या आहेत. पण त्यापैकी ३००-४०० लेण्या आपल्याला जुन्नर मध्ये पहावयास मिळतात. आणि अजून त्यामध्ये आवड निर्माण करणारी गोष्ट अशी की लेण्यामध्ये एकूण ३ प्रकार असतात.
१)चैत्य लेण्या : चैत्य लेण्या ज्या असतात त्या बहुतकरुन बौद्ध भिक्कू माहीत असतील तुम्हाला, तर बौद्ध भिक्कूना त्यांच्या धार्मिक कामासाठी वापरायच्या
२) विहार लेण्या : विहार लेण्या ज्या असतील त्या इतर गोष्टींसाठी म्हणूयात किंवा त्यांच्या वैयक्तिक कामासाठी त्या वापरायच्या.
३)आहग लेण्या: आणि ही आहग लेणी असत, ती आहग लेणी, जो पहिला राजा सातकर्णी होता, त्या सातकर्णी राजाची बायको होती नायनिका. तिने आपल्या पूर्वजांच्या मूर्ति होत्या त्यांना आपण पुतळे म्हणूयात, ते पुतळे तिने त्या आहग लेणी मध्ये स्थापन केले होते। तिथे आजसुद्धा त्या पुतळ्यांचे सात खड्डे आपल्याला पहायला मिळतात. तर त्या खड्ड्यांमध्ये पुतळे स्थापन केले होते, त्यांच्या वरती त्याच्या नावाची पाटी बनवून ठेवली होती.

अशी ही आहग लेणी तुम्हाला जगात कुठेच पहायला मिळत नाही, हे जगातल एक आश्चर्य ते फक्त जुन्नरमध्ये नाणेघाटातच पहायला मिळतं. 
 तुम्ही चैत्य आणि विहार लेण्या जगात कोठेही पाहू शकता, पण जर तुम्हाला आहग लेणी पहायची असेल तर तुम्हाला सम्पूर्ण जगभरातनं जुन्नरमध्ये नाणेघाटातच याव लागतं.
भिंतीवरील गुहा

कोकणातून वर आले की डाव्या आणि उजव्या बाजूला आपणास पाण्याची टाकी दिसतात. बाराही महीने पानी असलेली ही टाकी नक्कीच इथन वाटचाल कारणाऱ्यांसाठी पाण्याचा एक मुख्य स्त्रोत होता. जवळच तिथे सातवाहन कालीन गुहा आहे. गुहेच्या भिंतींवर ब्राम्हीलिपीत कोरलेले काही माहिती सुद्धा आपल्याला पहायला मिळते. या गुहेमध्ये एका वेळेस ५० लोक विश्रांती घेऊ शकतील इतकी जागा आहे.

इथून पुढे नाणेघाटाच्या माथ्यावर पोचण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. पावसाळ्यात याच पायऱ्यावरून धो धो पाणी वाहत असते.

नाणेघाटावर येणाऱ्या पायऱ्या

नानाच्या अंगठ्यावर पोचताना प्रचंड वारा असतो  तिथे टोकावर काळजी घेणे फार गरजेचे आहे. आजकाल सेल्फी काढताना बरेच अपघात होतात याची जाण असावी. समोरच आपल्याला जीवधन किल्ल्याची भिंत दिसते आणि त्या बाजूला उभा असलेला वानरलिंगी सुळका.
नानाच्या अंगठ्यावरून - श्री सुरेश देवकर निरीक्षण करताना 
समोर दिसणारा जीवधन किल्ला आणि वानरलिंगी सुळका

असा हा सुंदर नाणेघाट पाहण्याचा अनुभव प्रत्येकानेच घ्यायला हवा.

Ayudh Adventures तर्फे ६ ऑगस्ट २०१७ रोजी महिलांसाठी विशेष नाणेघाट ट्रेक आयोजित केला आहे.
हा ट्रेकमध्ये नवख्या ट्रेकर्स ना सुद्धा सहभाग घेता येऊ शकतो. नोंदणीसाठी अथवा काही माहिती हवी असल्यास ९३२०३०९६३६ वर संपर्क करावा. 

फेसबुक इव्हेंट ची लिंक खाली देत आहोत. 

https://www.facebook.com/events/1933791010202331/

जय भवानी। जय शिवराय।Ayudh Adventures assures you Exploring with MORE SAFETY and ENHANCED EXPERIENCE! 
Do visit our website for upcoming trek schedules and like our facebook page.
Let the world know we are alive. Giv'em a Shout!
Ayudh Adventures paytm Code for funds Transfer

Dear Trekkers, Avoid last moment hassles to register yourself on any trek.                                     We...